
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील गेल्या काही वर्षांत सगळ्यात जास्त लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते. पाच वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही मालिका आणि त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांची पुन्हा मनं जिंकली. या मालिकेत अरुंधतीच्या मोठ्या मुलाची अभिषेकची भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णी लग्नबंधनात अडकला. डेस्टिनेशन वेडिंग करत त्याने गुपचूप लग्नसोहळा उरकला.