
Entertainment News : कांटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं 27 जूनला निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्रीने जीव गमावला. मृत्यूसमयी तिचं वय 42 वर्षं होतं. काल 28 जूनला तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. शेफालीला अखेरचा निरोप देण्यासाठी तिचे कुटूंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि अनेक सेलिब्रिटी मंडळी उपस्थित होती.