
Entertainment News : टेलिव्हिजनवरील सगळ्यात जास्त गाजलेला कार्यक्रम म्हणजे सीआयडी. काही महिन्यांपूर्वी या गाजलेल्या कार्यक्रमाचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस आला. दुसऱ्या सीजनलाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. काही महिन्यांपूर्वी एसीपी प्रद्युमन म्हणजेच शिवाजी साटम यांनी शोमधून एक्झिट झाली आणि एसीपी आयुषमान या तरुण ऑफिसरची एंट्री झाली. या चर्चा संपता न संपतात तोच एसीपी आयुषमानची एक्झिट होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यावर एसीपी आयुषमानची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता पार्थ समथानने भाष्य केलं.