
Marathi Entertainment News : साउथ सुपरस्टार पवन कल्याणने त्याच्या बहुप्रतीक्षित अॅक्शन फिल्म ‘OG’ मधील आपला शूटिंग भाग पूर्ण केला असून, आता हा बिग बजेट प्रोजेक्ट थिएटरमधील मोठ्या रिलीजनंतर धमाका करण्यासाठी सज्ज आहे. निर्माते DVV एंटरटेनमेंट यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर ही माहिती शेअर करत म्हटलं, “गंभीरा साठी ‘पॅकअप’… आता रिलीजसाठी ‘गियर अप’… २५ सप्टेंबर २०२५ ला थिएटरमध्ये भेटूया!”