Entertainment News: मराठी अभिनेत्री प्राची पिसाट हिने अभिनेते सुदेश म्हशिलकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर आवाज उठवलाय. त्यांच्यासंदर्भात विविध पोस्ट करत ती चाहत्यांना अपडेट्स शेअर करतेय. अशातच तीने एक पोस्ट करुन चाहत्यांना सांगितलं की, 'पाच दिवस झाले तरी सुदेश म्हशिलकर यांच्याकडून कोणतीही माफी आलेली नाही. ' याशिवाय सुदेश म्हशिलकर यांचा फोन अनेक दिवसांपासून ऑफ येतोय.