
रंगभूमीवरील विनोदाचे बादशहा म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचे नवेकोरे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. ‘शिकायला गेलो एक’ असे या नाटकाचे नाव असून यातून रसिकांना पुन्हा एकदा अफलातून हास्यपर्वणी अनुभवता येणार आहे.
या नाटकाचा लवकरच शुभारंभ होणार असून पुण्यात २० डिसेंबरपासून प्रयोगांना सुरुवात होत आहे. या नाटकाचे २५ प्रयोग ‘सकाळ’तर्फे प्रस्तुत केले जात आहेत. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रयोगांचा यात समावेश आहे. या प्रयोगांसाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. आणि ‘द नेचर- मुकाईवाडी’ हे सहप्रायोजक आहेत. चितळे डेअरी यांचे विशेष सहकार्य या प्रयोगांना लाभले आहे.