
Marathi Entertainment News : पुणे महापालिकेने नाट्यगृह आरक्षणासाठी बनवलेल्या ऑनलाईन बुकिंग ॲपविरोधात मराठी कलाकार एकवटले आहेत. रंगयात्रा ॲप असं या ॲपचं नाव असून याविरोधात कलाकारांनी एकत्र येत आंदोलन केलं. नाट्यनिर्माते, नाट्य व्यवस्थापक, तंत्रज्ञ, रंगकर्मी आणि विविध सांस्कृतिक संस्थांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला राज्य नाट्यपरिषदेचे अध्यक्ष, अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले हजर होते.