
Marathi Entertainment News : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने चाहत्यांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. रॉकस्टार, बर्फी, संजू ते अलीकडील अॅनिमल अशा अनेक सुपरहिट चित्रपटांतून त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नुकताच रणबीरने आपला ४३वा वाढदिवस चाहत्यांसोबत साजरा केला. त्याच वेळी त्याने आपल्या करिअरमधील पुढील मोठ्या निर्णयाची हिंट सोशल मीडियावर दिली.