Ranbir Kapoor : कुणी म्हणतंय अयान तर कुणी म्हणतंय तुषार! रणबीरचा 'हा' वर्गमित्र नक्की आहे तरी कोण?

Ranbir Kapoor school days photo went viral : अभिनेता रणबीर कपूरचा शाळेतील फोटो व्हायरल होत असून त्याच्यासोबत असलेले मित्र कोण आहेत याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
Ranbir Kapoor School Memory
Ranbir Kapoor School MemoryEsakal

अभिनेता रणबीर कपूर जरी सोशल मीडियावर अक्टिव्ह नसला तरीही त्याचे लेटेस्ट फोटो आणि अक्टिव्हिटी कायमच ट्रेंड करतात. सध्या रणबीरचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याचा हा फोटो त्याच्या शाळेच्या दिवसांमधील असून त्याच्या फॅन पेजने हा फोटो पोस्ट केलाय. या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सोशल मीडियावर रणबीरचा हा शाळेच्या दिवसांमधील फोटो चर्चेत असून त्याच्या सोबत असलेले त्याचे हे मित्र कोण आहे याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. काहींनी हे फोटो पाहून अर्जुन बिजलानी, अयान मुखर्जी, बॉस्को मार्टीस, देव पटेल, विक्रमादित्य मोटवानी यांची नाव घेतली. काहींनी तर चक्क तुषार कपूरचं नावही घेतलं पण त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र कोण याचं खरं उत्तर कोणालाच देता आलं नाही.

Ranbir Kapoor School Memory
Ranbir kapoor: "राहा तिच्या आजोबांसारखीच होणार " असं नीतू यांनी म्हणताच रणबीरचे डोळे पाणावले

त्यानंतर एका युजरने सोशल मीडियावर कमेंट करत रणबीरच्या शाळेच्या फेअरवेलवरील फोटोवर कमेंट करत त्याच्या शेजारी असलेला मुलगा अमोल पिंगे असल्याचं सांगितलं. सदर युजरने त्याच आणि अमोल पिंगे यांचं नातं असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं. तर दुसऱ्या फोटोमध्ये असलेली मुलगी ही सुप्रसिद्ध ज्योतिषी रमोना आहे. तिने या फोटोवर कमेंट करत स्वतःची ओळख करून दिली. "मी रणबीरची क्लासमेट होते पण त्या दिवशी मी त्याची टीचर झाले होते." अशी आठवण शेअर केली. पण या फोटोमधील तिसऱ्या मुलाची ओळख मात्र अजून उघड झाली नाहीये.

Ranbir Kapoor School Memory
Ranbir Kapoor School MemoryEsakal

दरम्यान, टेलिव्हिजन स्टार अर्जुन बिजलानी सुद्धा रणबीरचा वर्गमित्र आहे. एका टेलिव्हिजन शोमध्ये रणबीरने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला होता. अर्जुन या शोचं सूत्रसंचालन करत होता त्यावेळी रणबीरने अर्जुन त्याचा वर्गमित्र असल्याची आठवण सांगितली आणि आज त्याने मिळवलेलं यश बघून मित्र म्हणून त्याचा अभिमान वाटत असल्याचं तो म्हणाला. विशेष म्हणजे रणबीर आणि अर्जुन एकाच फुटबॉल टीममध्ये होते आणि एका हाऊसमध्ये सुद्धा होते.

Ranbir Kapoor School Memory
Alia Bhatt And Ranbir Kapoor: रणबीर-आलियाचं स्पेशल अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन, मेन्यूकार्डवरील राहाच्या चित्राने वेधलं लक्ष

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com