Alia Bhatt And Ranbir Kapoor: रणबीर-आलियाचं स्पेशल अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन, मेन्यूकार्डवरील राहाच्या चित्राने वेधलं लक्ष

Alia Bhatt And Ranbir Kapoor: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांचा दुसरा लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट केला.
रणबीर-आलियाचं स्पेशल अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन, मेन्यूकार्डवरील राहाच्या चित्राने वेधलं लक्ष
Ranbir Kapoor and Alia Bhatt esakal

Alia Bhatt And Ranbir Kapoor: सेलिब्रिटी कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी नुकताच त्यांचा दुसरा लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट केला. चाहत्यांमध्ये #रालिया या नावाने प्रसिद्ध असलेली ही जोडी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फार गोष्टी रिव्हील करत नाही. पण नुकतेच त्यांच्या या सिक्रेट अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रणबीर, आलिया आणि त्यांची लेक राहा यांनी एकत्र छोटंसं पण तितकंच सुंदर सेलिब्रेशन केलं.

त्यांचं हे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन खूप खास होतं. या सेलिब्रेशनसाठी खास कस्टम मेड मेनू कार्ड बनवण्यात आलं होतं. या मेनूकार्डवर आलिया, रणबीर आणि राहा यांचे कार्टून्स काढण्यात आले होते. हे क्युट मेनूकार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या सोबतच आलिया आणि रणबीरचा एकमेकांना मिठी मारतानाचा फोटोही चर्चेत आहे. या फोटोवर त्यांच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीची तारीख दिसतेय. त्यांच्या या छोट्याशा पण गोड सेलिब्रेशनने चाहत्यांचं मन जिंकून घेतलं. त्यांच्या खास शेफने त्यांच्या या स्पेशल सेलिब्रेशनचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते.

काही दिवसांपूर्वीच रणबीर आणि आलिया त्यांच्या नव्या बेन्टली कॉन्टिनेन्टल जीटी व्ही ८ या गाडीतून लेक राहाला फिरवण्यासाठी घेऊन गेले होते. सोशल मीडियावर कपूर फॅमिलीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

रणबीर-आलियाचं स्पेशल अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन, मेन्यूकार्डवरील राहाच्या चित्राने वेधलं लक्ष
Alia Bhatt And Ranbir Kapooresakal
रणबीर-आलियाचं स्पेशल अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन, मेन्यूकार्डवरील राहाच्या चित्राने वेधलं लक्ष
Ranbir kapoor: "राहा तिच्या आजोबांसारखीच होणार " असं नीतू यांनी म्हणताच रणबीरचे डोळे पाणावले

रणबीर सध्या त्याच्या आगामी ‘रामायण’ सिनेमाच्या तयारीत बिझी असून लवकरच तो या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करेल. तर आलिया सुद्धा येत्या काळात अनेक नवीन सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच तिने अनिल कपूर यांच्यासोबत यशराज स्टुडिओजची एक स्पाय फिल्म साइन केली असून ‘राझी’ सिनेमानंतर बऱ्याच काळाने आलिया पुन्हा एकदा गुप्तहेराच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

याशिवाय प्रेक्षक त्यांच्या आगामी ब्रम्हास्त्र २ या सिनेमाचीही आतुरतेने वाट पाहत आहेत. अयान मुखर्जीचं दिग्दर्शन असलेला या सिनेमाचा दुसरा पार्ट डिसेंबर २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात रणबीर-आलियासोबत अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया यांचीही मुख्य भूमिका आहे तर दुसऱ्या भागात दीपिका पदुकोणसुद्धा दिसणार असल्याचं म्हंटलं जातंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com