
Marathi Entertainment News : प्रसिद्धी आणि इंडस्ट्रीचा लखलखाट अनेकांना भुरळ घालतो आणि सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे आता प्रत्येकालाच प्रसिद्ध होण्याची इच्छा वाढली आहे. अभिनेता किंवा अभिनेत्री व्हावं अशी इच्छा जशी तरुणांमध्ये वाढतेय तितकंच आपल्या मुलाने बालकलाकार म्हणून नाव कमवाव यासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांचं प्रमाण वाढतंय. पण मुलांच्या टॅलेंटसाठी नाही तर त्यांना सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळावी म्हणून अनेक पालक धडपडताना दिसत आहेत. त्यावर अभिनेता समीर चौघुलेने भाष्य केलं.