
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील एक प्रतिष्ठित आणि दमदार अभिनेते म्हणजे संजीवकुमार. एक चतुरस्त्र कलावंत म्हणून ओळख असणाऱ्या या व्यक्तिमत्वाने जगाच्या रंगमंचावर खूप लवकर एक्झिट घेतली. सहकलाकार, नायक ते अगदी चरित्र भूमिकाही संजीवकुमार यांनी गाजवल्या पण अल्पायुषाचा दुर्दैवी शाप त्यांना भोगावा लागला.