
Marathi Entertainment News : सध्याची मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिका म्हणजे पारू. पारू आणि आदित्य यांची गोष्ट असलेल्या या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. या मालिकेत आदित्यच्या काकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता शंतनू गांगणेने काही दिवसांपूर्वी ही मालिका सोडली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने पैसे बुडवणाऱ्या निर्मात्यांचा नाव घेऊन उल्लेख केला.