
paaru serial
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली मालिका 'पारू' प्रेक्षकांची आवडती आहे. मालिकेती पारू आणि आदित्यची जोडीही प्रेक्षकांची लाडकी आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी मालिकेत दाखवण्यात आलेल्या एका कलाकाराने अचानक मालिकेचा निरोप घेतला. हा कलाकार म्हणजे शंतनू गांगणे. शंतनू अनेक दिवस मालिकेतून गायब होता. मात्र नंतर त्याने ही मालिका सोडल्याचं समजलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने यामागचं कारण सांगितलं आहे. त्याने मालिका सोडली नव्हती तर त्याला मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्याला मालिका सोडावी लागली असं तो म्हणालाय. वेळेवर पैसे न दिलेल्या व्यक्तींबद्दल, निर्मात्यांबद्दल बोलल्याने मालिकेतून हळूहळू त्याला गायब करण्यात आलं.