"आपल्या जीवाची या देशात किंमत नाही" ; घाटकोपर दुर्घटनेनंतर अभिनेत्याने व्यक्त केला संताप !

Shashank Ketkar : अभिनेता शशांक केतकरने सोशल मीडियावर घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत पोस्ट शेअर करत त्याचा संताप व्यक्त केला.
Shashank Ketkar
Shashank KetkarE sakal

घाटकोपरमध्ये घडलेली होर्डिंग दुर्घटना सध्या चर्चेत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सरकारी यंत्रणांवर सगळीकडून टीका होतेय. अभिनेता शशांक केतकरने सुद्धा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्याचं मत मांडलं. शशांकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

"मी माझ्या मित्राची वाट बघत आता इथे रस्त्यात थांबलोय. गाडी पार्क केलेली आहे आणि हा व्हिडीओ मी शूट करतोय गाडीत बसून. कुठल्याही नो पार्किंगमध्ये गाडी लावलेली नाहीये. हे सगळं स्पष्ट करण्याचं कारण इतकंच कि, कित्येक जणांना वाटेल व्हिडीओ बघितल्यावर कि अरे तूच नियम मोडतोस, कुठेही गाडी पार्क केलीयेस, तुलाच देशाची पर्वा नाही किंवा तू अंधभक्त आहेस किंवा काँग्रेस विरोधक आहेस वगैरे वगैरे पण काल मुंबईमध्ये एक वादळ आलं त्यात काही घटना घडल्या. त्या घटनांमध्ये घाटकोपरमध्ये जे काही घडलं ते आपण पाहिलंच. १२० फूट बाय १२० फूट एक मोठ्ठच्या मोठ्ठ होर्डिंग पेट्रोल पंपाच्या छतावरती पडलं. दुर्दैवाने त्यावेळी पाऊसही पडत होता त्यामुळे काही जण त्या पेट्रोल पंपच्या छताखाली थांबले होते. दुर्दैवाने तो बोर्ड पडला आणि काहीजणांचा मृत्यू झाला. मला याबाबत कोणत्याच पार्टीला दोष द्यायचा नाहीये कारण ही एक नैसर्गिक आपत्ती होती. पण मला पुन्हा असं वाटत कि आपल्या देशाची लोकसंख्याच इतकी आहे कि इथे आपल्या जीवाची काहीच किंमत नाही. आता बातम्यांमधून कळतंय कि तो बोर्ड अनधिकृत होता त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्या बोर्डचा मालक पळून गेलाय. आपल्या देशात खूप चांगले बदल काही काळापूर्वी घडले आहेत पण अजूनही सुधारणा होणं गरजेचं आहे. सत्ता कुणाचीही असो पण रस्ते सुधारा , रस्त्यावर लावलेले अनधिकृत फ्लेक्स काढून टाका. त्यातून अनेक पक्ष्यांचा जीव जातो आणि आम्हाला ते बघण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये, त्यातून अपघातही होऊ शकतात. " असं म्हणत शशांकने त्याचा संताप व्यक्त केला.

शशांकने शेअर केलेला हा संपूर्ण व्हिडीओ चौदा मिनिटांचा असून या व्हिडिओमध्ये त्याने अनधिकृत होर्डिंग्ज आणि फ्लेक्स, ट्रॅफिकची समस्या, रस्त्यांचं रुंदीकरण, ब्रिजवर नसणारे सीसीटीव्ही, कचऱ्याची समस्या, ड्रायव्हिंग आणि ट्रॅफिकच्या नियमांबाबत असलेला अशिक्षितपणा या सगळ्यांवर भाष्य केलं आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत ते त्याच्याशी सहमत असल्याचं सांगितलं तर अनेकांनी त्यांच्या परिसरातील समस्याही शेअर केल्या आहेत.

शशांकने या व्हिडिओला "आपल्या जिवाची किंमत नाही हेच खरं आहे. video खूप मोठा आहे. कारण राग अनावर झालाय… आज आपण सुखरुप घरी पोहोचलो म्हणजे आपलं नशीब बलवत्तर असं म्हणायची वेळ आली आहे." असं कॅप्शन दिलं आहे.

Shashank Ketkar
Shashank Ketkar: सगळे सण साजरे करण्याच्या पद्धती.. 'हिंदी'च्या अनुकरणावर शशांक केतकर भडकला..

दरम्यान, शशांकने या आधीही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक समस्यांवर भाष्य केलं आहे. सध्या तो स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेत काम करत असून त्याची ही मालिका चांगलीच गाजतेय.

Shashank Ketkar
Shashank Ketkar : 'एवढ्याशा पैशात घर कसं चालणार'? शशांकचा प्रश्न

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com