
Marathi Entertainment News :महेश मांजरेकर पुन्हा एकदा त्यांचा गाजलेला मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. पुन्हा शिवाजी राजे भोसले असं या सिनेमाचं नाव आहे. नुकतंच या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ बोडकेचा पहिला लूक (फर्स्ट लूक) समोर आला आहे.