
Marathi Entertainment News : आई-वडील मुलांना उघडं-नागडं पाहतात, पण एका मुलाने आपल्या वडिलांना अशा अवस्थेत पाहणे तो प्रसंग व्यक्त करायला शब्द नाहीत. २०१६ मध्ये पप्पांना हृदयविकाराचा झटका आला. बायपास शस्त्रक्रिया सुरु होती. त्या दिवशी मी आठ तास ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांच्या सोबत होतो. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण क्षण होता. त्यांच्या धडधडणाऱ्या काळजावर चाललेली ही लढाई... माझ्यासाठी तो रुग्ण कुणी अनोळखी नव्हता, तो माझा बाप होता. त्या क्षणी एक मुलगा म्हणून नव्हे, तर डॉक्टर म्हणून मी तिथे होतो. त्यावेळेला मी बाहेर पडलो असतो तर मम्मी, भाऊ सगळ्यांनी मला प्रश्न केले असते. त्यामुळे पप्पांना या परिस्थितीतून बाहेर काढणे ही माझी जबाबदारी होती. या सगळ्या प्रसंगाने मला एक गोष्ट शिकवली वडील म्हणजे काय? त्यांच्या अस्तित्वाची किंमत फक्त बाप गार झाल्यावर कळते, पण मी ती थरारक क्षणात अनुभवली. पप्पांना हार्ट अटॅक आला, तेव्हा पहिला फोन त्यांच्या ड्रायव्हरने मला केला. तो फोन म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट बातमी.