अभिनेत्री प्राची पिसाटने काही दिवसांपूर्वी अभिनेता सुदेश म्हशिलकर यांनी पाठवलेले अश्लिल मॅसेज सोशल मीडियावर शेअर केले. या मॅसेजनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. अनेक जणांनी सुदेश म्हशिलकर यांच्यावर टीका केलीय. दरम्यान आता या सर्व प्रकरणावर सुदेश म्हशिलकर यांनी मौन सोडलं आहे.