
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील एकेकाळच्या सुंदर अभिनेत्री म्हणजे नर्गिस दत्त. मदर इंडिया, श्री 420, आवारा या सिनेमांमुळे नर्गिस यांनी स्वतःची वेगळी ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण केली. 1981 मध्ये नर्गिस कॅन्सरने 51 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर दत्त कुटूंबावर झालेल्या परिणामाच्या आठवणी त्यांच्या मुलीने नुकत्याच एका मुलाखतीत शेअर केल्या.