

SUSHANT SHELAR
ESAKAL
SUSHANT SHELAR VIRAL VIDEO: छोट्या आणि मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय अभिनेता सुशांत शेलार याच्या 'दुनियादारी' चित्रपटातील एका डायलॉगने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हमे सस्ती चिजो का शॉक नही असं म्हणणारा सुशांत आता भलत्याच अडचणीत सापडलाय. काही दिवसांपूर्वी सुशांतचे काही फोटो व्हायरल झाले होते. ज्यात तो खूप बारीक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र तो आपला चित्रपटासाठीचा लुक असलीच त्याने सांगितलं. आता सुशांत एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याच्यावर एका मराठी उद्योजकाने मोठे आरोप केले आहेत. काम करण्यासाठी सुशांतने आपल्याकडे पैसे मागितले असं त्याने सांगितलंय. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.