

Entertainment News : भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या भव्यदिव्य चित्रपटाबाबत नवनव्या चर्चा सुरू असतानाच आता आणखी एक महत्त्वाची बाब समोर येत आहे. रणबीर कपूर आणि यश प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटात अभिनेता विजय सेतुपती सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, त्याच्याकडे रावणाचा भाऊ आणि धर्माची बाजू घेणाऱ्या विभीषण या व्यक्तिरेखेची जबाबदारी सोपवली जाणार आहे.