

Gustakh Ishq Movie Trailer
esakal
Entertainment News : “माझा लहेजा काटेरी कॅक्टससारखा, तुझे शब्द रातराणीच्या सुवासासारखे…” या ओळींनी सुरू होणारी कथा आहे ‘गुस्ताख इश्क’ या आगामी चित्रपटाची, जी एका जुनूनी कवीच्या प्रेमकहाणीला वेगळ्या उंचीवर नेत असल्याचे पाहायला मिळते. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी निर्मिती केलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक कलात्मक आणि भावनिक अनुभव ठरणार असून, या महिन्याच्या अखेरीस तो प्रदर्शित होणार आहे.