
Entertainment News : गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती होमबाउंड या आगामी सिनेमाची. ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाचं तेथील समीक्षक आणि उपस्थितांकडून भरभरून कौतुक करण्यात आलं. या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विशाल जेठवाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या स्ट्रगलवर भाष्य केलं.