
Bollywood Entertainment News : हिरामंडी फेम अभिनेत्री अदिती राव हैदरीने तिचा नवरा सिद्धार्थशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील अलीला किल्ला बिशनगढ येथे त्यांचा राजेशाही विवाहसोहळा थाटात पार पडला. सोशल मीडियावर तिने या विवाहसोहळ्याचे फोटो शेअर करत त्याला "एकमेकांचा हात आयुष्यभर धरणं हे सर्वोत्तम आहे" (The best this to hold on to in life is each other) असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.