

Entertainment News : मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आता एका नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर हे ५ ताकदीचे आणि दिलदार निर्माते या नाटकासाठी एकत्र आले आहेत. दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाच्या निमित्ताने ऐश्वर्या व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे. मालिकांच्या धावपळीतून थेट नाट्यगृहाच्या मंचावर येण्याचा हा अनुभव तिच्यासाठी केवळ काम नसून एक 'युनिव्हर्सिटी' असल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत.