
Hindi Television News : हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त ठरलेला शो म्हणजे अनुपमा. रुपाली गांगुलीची मुख्य भूमिका असलेला हा शो प्रसिद्ध असला तरीही सेटवरील वाद कायमच चर्चेत असतात. काही काळापूर्वीच या मालिकेतील अनेक कलाकारांनी एकाचवेळेस ही मालिका सोडली. यामुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला. त्यातच आता मालिकेत आलेल्या लीपनंतर रुपालीबरोबर राही ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री आलिशा प्रवीणला रातोरात काढून टाकण्यात आलं.