
Marathi Entertainment News : लठ्ठ असणं कुणालाच फारसं प्रिय नसतं. आपल्या लठ्ठपणाचा कॉम्प्लेक्स अनेकांना येत असतो. बारीक होण्याची धडपड. त्यासाठी चालणं, सायकलिंग, डाएटचे वेगवेगळे प्रकार, औषधं, जिम आणि बरंच काही... सुरु असतं. याच लठ्ठपणावर भाष्य करणारं 'अष्टविनायक' आणि 'विप्रा क्रिएशन्स' यांची प्रस्तुती असलेलं एक ‘वजनदार’ नाटक रंगभूमीवर येऊ घातलं आहे. विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने मनोरंजनसृष्टीत आपल्या खणखणीत ‘वजनदार’ अभिनयाच ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल या नाटकाच्या निमित्ताने २७ वर्षांनी त्या पुन्हा रंगभूमीकडे वळल्या आहेत.