
Marathi Entertainment News : या वर्षाच्या सुरुवातीपासून अनेक कलाकारांनी गुड न्यूज दिली. अनेक बॉलिवूड आणि मराठी कलाकारांच्या घरी छोट्या पाहुण्यांचं आगमन होणार आहे. बॉलिवूडमधील सिद्धार्थ -कियारा असो किंवा मराठी इंडस्ट्रीमधील मोनिका दाबके असो त्यांच्या गुडन्यूजमुळे चाहतेही खुश आहेत. त्यातच आता आणखी एका मराठी अभिनेत्रीच्या घरी बाळाचं आगमन होणार आहे. सोशल मीडियावर डोहाळेजेवणाचा व्हिडीओ शेअर करत तिने ही बातमी शेअर केली.