Viral Video : आणि लाडक्या मित्राच्या लग्नासाठी नोरा पोहोचली कोकणात ; झिंगाटवर ठेका अन् वरण भातावर मारला ताव
Nora Fatehi Dance On Zingat : अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या लाडक्या मित्राच्या लग्नासाठी कोकणात हजेरी लावत झिंगाटवर डान्स केला. सोशल मीडियावर नोराचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Marathi Entertainment News : बॉलिवूडमध्ये आपल्या अदांनी आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी नोरा चक्क कोकणात पोहोचली. नोराचा मित्र आणि कॅमेरामन असलेल्या अनुप सुर्वेचं लग्न होतं. यानिमित्त नोराने त्याच्या लग्नाला हजेरी लावत धमाल केली.