
Bollywood Entertainment News : गेल्या काही वर्षात अनेक बॉलिवूड कलाकारांनी धार्मिक कारणांमुळे बॉलीवूडला रामराम केला आहे. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे बरखा मदान. माजी मॉडेल, अभिनेत्री आणि ब्युटी क्वीन असलेली ही अभिनेत्री एकेकाळी ऐश्वर्या आणि सुश्मिताची कट्टर स्पर्धक होती. पण पुढे तिने ग्लॅमरस दुनिया सोडत बौद्ध समाजाचं साध्वीपद स्वीकारलं आणि आता ती साधारण जीवन जगतेय.