
'मैने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीचा अपघात झाला आहे. अभिनेत्रीच्या कपाळावर खोल जखम झाली असून 13 टाके पडले आहेत. या घटनेनंतर भाग्यश्रीला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. भाग्यश्रीचे शस्त्रक्रियेपूर्वीचे आणि नंतरचे फोटो व्हायरल होत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'पिकल बॉल' खेळताना अभिनेत्रीला दुखापत झाली. चाहते फोटोंवर कमेंट करून चिंता व्यक्त करत आहेत आणि ती लवकर बरे व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.