

Bollywood Actress Who Did First Kissing Scene In Movie
esakal
Entertainment News : बॉलिवूडमध्ये आता बोल्ड सीन किंवा किसिंग सीन नवीन राहिले नाहीयेत. पण एक काळ असा होता जेव्हा स्त्रियांना सिनेमात अभिनय करण्यासही बंदी होती. स्त्रियांनी छोटे कपडे घालणे हे समाजमान्यतेविरुद्ध होते. अशा वेळी एका अभिनेत्रीने चक्क ऑनस्क्रीन बोल्ड सीन दिला होता. या अभिनेत्रीला भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली बोल्ड महिला म्हणून संबोधलं गेलं. ही अभिनेत्री आहे देविका राणी.