Disha Patni Bikini Photoshoot Went Viral
Disha Patni Bikini Photoshoot Went ViralEsakal

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

अभिनेत्री दिशा पटनीने शेअर केलेल्या बिकिनी फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. तिचे हे लेटेस्ट फोटो पाहून नेटकरी तिच्यावर फिदा झाले.

Disha Patani : बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री दिशा पटनीच्या सोशल मीडिया पोस्ट कायमच चर्चेत असतात. कधी तिचे वर्क आऊट सेशन्स तर कधी तिचे बोल्ड फोटोशूट्स नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. नुकतंच दिशेने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आणि हे फोटोंनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय.

दिशाने नुकतेच तिचे बीचवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. जांभळ्या रंगाच्या बिकिनीमधील दिशाच बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज पाहून नेटकरी तिच्यावर फिदा झाले आहेत. सूर्यास्तावेळी समुद्र किनाऱ्यावर काढलेल्या या फोटोमध्ये दिशाचं सौंदर्य खुलून दिसतंय. तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये फुलाचा इमोजी शेअर केलाय.

तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं. अभिनेत्री मौनी रॉयने "उफ्फ.. " अशी कमेंट करत तिच्या बोल्ड अंदाजाचं कौतुक केलं तर एका युजरने "ब्रेकिंग द हॉटनेस " अशी कमेंट करत तिचा फोटो आवडल्याचं म्हटलंय. तर एकाने "तुझ्या हॉटनेसची बरोबरी कोणीही नाही" अशी कमेंट केली आहे. तर एकाने "तू बोल्डनेसच्या सगळ्या सीमा पार केल्या आहेस." अशी कमेंट करत तिचं कौतुक केलं.

या आधीही दिशाने तिचे असेच अनेक बोल्ड लुक्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बोल्ड फोटोशूट्ससाठी प्रसिद्ध असलेली दिशा फिटनेसकडेही तितकंच लक्ष देते. तर तिने कराटे, जिम्नॅस्टिक सारख्या क्रीडा प्रकारांचं ट्रेनिंग घेतलं आहे. दिशाला अॅक्शनपटांमध्ये रस असून ती बऱ्याचदा तशाच प्रकारच्या सिनेमांमध्ये काम करत असल्याचं गेल्या काही काळात दिसून आलं आहे.

Disha Patni Bikini Photoshoot Went Viral
Disha Patani : 'मॅडम ID कार्ड प्लीज'! दिशा भरकटली, सुरक्षारक्षकानं परत पाठवलं

दिशाने 'लोफर' या तेलुगू सिनेमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या आधी तिने बराच काळ मॉडेलिंग केलं होतं. दिशाची मोठी बहीण भारतीय सैन्यदलात कार्यरत होती तर दिशानेही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. दिशाने 'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात तिने साकारलेली प्रियांका झा ही भूमिका लोकप्रिय झाली. त्यानंतर दिशा बागी २ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. हा तिचा सिनेमाही सुपरहिट ठरला.

आता लवकरच ती 'वेलकम २ जंगल' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती अभिनेता अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि जॅकलिन फर्नांडिझ यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

Disha Patni Bikini Photoshoot Went Viral
Disha Patani: आला होळीचा सण लय भारी... टायगर, दिशाने उधळले अक्षयसोबत रंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com