
Hina Khan Cancer Update : हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एक दमदार अभिनेत्री म्हणजे हिना खान. हिंदी टीव्ही आणि वेब इंडस्ट्रीमध्ये मोजके प्रोजेक्ट करूनही हिना आज आघाडीची अभिनेत्री आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री सध्या कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाशी निकराची झुंज देतेय. नुकतंच तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.