Hruta Durgule : ऋताचं हिंदी वेब विश्वात दमदार पदार्पण ; साकारणार 'ही' भूमिका

Hruta in hindi web series : अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिंदी वेबविश्वात पदार्पण करतेय.
Hruta Durgule
Hruta DurguleEsakal

Hruta in hindi webseries : मराठी टेलिव्हिजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे. फार कमी कालावधीतच ऋताने फक्त मालिकाच नाही तर सिनेमा आणि नाट्यविश्वातही स्वतःची छाप सोडलीय. ऋता आता हिंदी वेब विश्वात पदार्पण करतेय. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने या बाबतची पोस्ट शेअर केली.

Hruta Durgule
Hruta durgule and Preetek shah Engagement : ऋता आणि प्रतिकच्या साखरपुड्याचा व्हिडिओ व्हायरल |

ऋताची पोस्ट

ऋताने सोशल मीडियावर एका अपकमिंग वेब सिरीजचा टीझर शेअर करत ती या वेब सिरीजमध्ये काम करणार असल्याची हिंट दिलीये. डीझने हॉटस्टार ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच येणाऱ्या 'कमांडर करण सक्सेना' या वेब सिरीजमध्ये ऋता काम करतेय. ऋताने या टीझरला 'Finally ❤️✨
Commander Karan Saxena Reporting For Team India !! 🇮🇳' असं कॅप्शन दिलं आहे. या वेब सिरीजमध्ये गुरमीत चौधरी मुख्य भूमिकेत आहे. याबरोबरच इकबाल खानही विशेष भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ऋता या सिरीजमध्ये नेमकी कोणती भूमिका साकारणार ? तिचा लूक कसा असेल ? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. पण याचं उत्तर ऋताचा नवरा प्रतीक शाहने दिलं. ऋता या सिनेमात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याची त्याने हिंट दिली. 'पिक्चर अभी बाकी है सीझेड हिरोईन इन खाकी है #पोलीस' अशी कमेंट केली आहे.

ऋताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तीच अभिनंदन केलं आणि तिला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .

Prateek Shah comment
Prateek Shah commentEsakal

ऋताची कारकीर्द :

ऋताने दुर्वा या मालिकेतून मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं. तिची ही मालिका हिट ठरली. त्यानंतर ऋता प्रेक्षकांच्या भेटीस आली ती 'फुलपाखरु' या मालिकेतून. ही तिची मालिका तिच्या पहिल्या मालिकेपेक्षाही सुपरहिट झाली होती. तिच्या आणि यशोमान आपटेच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. यानंतर तिने 'अनन्या' हा तिचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर ऋता 'टाईमपास ३', 'सर्किट' आणि 'कन्नी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलं. तर रंगभूमीवर आलेलं तिचं 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक खूप गाजलं पण काही काळाने तिने हे नाटक सोडलं. या नाटकात तिने उमेश कामतबरोबर काम केलं होतं.

Hruta Durgule
Hruta Durgule: मिस्टर शाह तुमचा जयजयकार! हृता दुर्गुळेने केलं अहोंचं अभिनंदन, हे आहे खास कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com