
Bollywood News : अभिनेत्री काजोल ही एक सशक्त अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने विविध प्रकारचे चित्रपट केले आहेत आणि प्रत्येक भूमिकेमध्ये तिने आपले वेगळे अस्तित्व सिद्ध केले आहे. आता तिचा माँ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तब्बल तीनेक वर्षांनी रुपेरी पडद्यावर परतणाऱ्या काजोलने या चित्रपटामध्येही आपले वेगळे अस्तित्व सिद्ध केले आहे. चित्रपटाची कथा, चित्रपटाचे पार्श्वसंगीत त्याचबरोबर कलाकारांचा दमदार अभिनय आणि विशाल फुरियाचे नेटके दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट शेवटपर्यंत थरार निर्माण करणारा तसेच रोमांचक झाला आहे.