Kareena Kapoor : पापाराझीसमोरच करीना-सैफने केलं किस ; व्हिडीओ पाहून चाहते म्हणतात..

Kareena-Saif's kissing video went viral: अभिनेत्री करीना कपूर आणि तिचा नवरा सैफ यांचा किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Kareena Kapoor
Kareena KapoorEsakal

बॉलिवूड कपल सैफ आणि करीनाचे अनेक चाहते आहेत. स्वतःचं वैयक्तिक आयुष्याविषयी ते फार बोलणं टाळतात पण नुकताच त्या दोघांच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

करीना आणि सैफ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये करीना आणि सैफ त्यांच्या सोसायटीमधून बाहेर पडताना दिसत आहेत. त्या दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे घातले. त्यांचं बोलणं सुरु असतानाच एकमेकांना किस केलं. त्यांच्या घराबाहेर उभ्या राहिलेल्या पापाराझींनी कॅमेऱ्यात हे क्षण कैद केले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांच्यातील प्रेमाचं आणि बॉण्डिंगचं अनेकांनी कमेंट्समध्ये कौतुक केलं आहे.

पहा व्हिडीओ:

अनेकांनी कमेंट्समध्ये ही जोडी त्यांना खूप आवडते असं म्हंटलं तर अनेकांनी त्यांनी पुन्हा एकत्र प्रोजेक्टमध्ये दिसावं अशी इच्छा व्यक्त केली. ही जोडी कायमच एकमेकांचा आदर करते आणि एकमेकांच्या कुटुंबालाही सांभाळते हे त्यांच्या चाहत्यांना खूप आवडलं. या आधीही या दोघांचे अनेक व्हिडीओज व्हायरल झाले असून त्यांचा बॉण्ड कायमच चर्चेत असतो.

Kareena Kapoor
Kareena Kapoor Khan: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने करीना कपूरला बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय?

करीना-सैफची लव्हस्टोरी

२००८ मध्ये रिलीज झालेल्या 'टशन' सिनेमाच्या शूट दरम्यान या दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली. तर २०१२ मध्ये ही जोडी लग्नबंधनात अडकली. या आधी सैफचं लग्न अमृता सिंहशी झालं होतं. २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सैफच्या आजारपणात करीनाने त्याची खूप काळजी घेतली. त्यांचं बॉण्डिंग तिथूनच वाढलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सैफला पहिल्या लग्नातून सारा आणि इब्राहिम ही मुलं आहेत तर करीना-सैफला तैमूर आणि जहांगीर ही दोन मुलं आहेत.

करीनाचे अपकमिंग प्रोजेक्ट्स

करीनाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'क्रू' सिनेमाला प्रचंड यश मिळालं. या सिनेमात तिच्यासोबत तब्बू आणि क्रिती सेनॉनची मुख्य भूमिका होती. तर करीनाने यशसोबतचा आगामी टॉक्सिक सिनेमा नाकारला. तिच्या शूटिंगच्या तारखा जुळत नसल्याने तिने माघार घेतल्याचं म्हंटलं जातंय. याशिवाय ती सिंघम अगेन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर सैफ अली खान आता ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या देवरा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Kareena Kapoor
Saif Ali Khan: "आम्ही मुलांना जन्म देतो त्यांना स्टारकिड तुम्ही बनवता"; सैफ अली खान थेटच बोलला!

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com