Kareena Kapoor Khan: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने करीना कपूरला बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Kareena Kapoor Khan: उच्च न्यायालयाने करीनाला नोटीस बजावून, त्याला सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
Kareena Kapoor Khan
Kareena Kapoor Khanesakal

Kareena Kapoor Khan: बॉलिवूडनमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही सध्या चर्चेत आहे. करीना कपूरला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (Madhya Pradesh High Court) नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाने करीनाला नोटीस बजावून, त्याला सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. जाणून घेऊयात या संपूर्ण प्रकरणाबद्दल...

नेमकं प्रकरण काय?

ॲडव्होकेट ख्रिस्तोफर अँथनी यांनी जबलपूरच्या स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी म्हटलं की, करीनाने ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत कारण 'पवित्र ग्रंथ बायबल'ची तुलना करीनाच्या गर्भधारणेशी होऊ शकत नाही. पण पोलिसांनी करीनाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. त्यानंतर ॲडव्होकेट ख्रिस्तोफर अँथनी यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊन खासगी तक्रार दाखल केली. पण 'बायबल' या शब्दाचा वापर करुन करीनानं ख्रिश्चन समाजाच्या भावना कशा दुखावल्या गेल्या? हे सिद्ध करण्यात ख्रिस्तोफर अयशस्वी ठरल्यानं दंडाधिकारी न्यायालयानेही याचिका फेटाळून लावली. यानंतर त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली असता तेथेही त्यांची याचिका फेटाळण्यात आली. अशा परिस्थितीत आता त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Kareena Kapoor Khan
Kareena Kapoor Khan: 'जब वी मेट'; जेव्हा शाहिद अन् करीना समोरासमोर येतात, व्हिडीओची सर्वत्र चर्चा

ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप

ॲडव्होकेट ख्रिस्तोफर अँथनी यांनी करीना कपूरनं तिच्या 'करीना कपूर खान प्रेग्नन्सी बायबल' या पुस्तकात 'बायबल' हा शब्द वापरून ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. करीना कपूरविरुद्ध एफआयआर दाखल करावा, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. या संपूर्ण प्रकरणी आता उच्च न्यायालयाने करीना कपूरला नोटीस बजावली असून सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

2021 मध्ये करीना कपूरने 'प्रेग्नन्सी बायबल' हे तिचे पुस्तक लॉन्च केले होते. सध्या या पुस्तकाच्या नावामुळे ती चर्चात आहे.

Kareena Kapoor Khan
Kareena Kapoor Khan : करिना कपूर रिटायरमेंट घेणार? काय दिलं बेबोनं उत्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com