
Bollywood News : गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आहे ती रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या डॉन 3 ची. फरहान अख्तरची निर्मिती असलेल्या या सिनेमाची घोषणा काही काळापूर्वी करण्यात आली. या सिनेमात अभिनेत्री कियारा अडवाणी रोमा ही मुख्य भूमिका साकारणार होती. पण गरोदर असल्यामुळे तिने या सिनेमातून काढता पाय घेतला. आता तिच्या जागी दुसऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी लागली असल्याची चर्चा आहे. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.