

MADHAVI NEMKAR HOTEL
ESAKAL
गेल्या काही वर्षात अनेक मराठी कलाकार व्यवसायाकडे वळले. काहींनी स्वतःचं हॉटेल सुरू केलं तर काहींनी स्वतःचं साड्यांचं दुकान सुरू केलं. काहींनी ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला तर काहींनी नेल आर्ट सुरु केलं. अशातच आता आणखी एक अभिनेत्री या क्षेत्रात उतरलीये. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी स्वतःचं हॉटेल सुरू केलं. ही अभिनेत्री आहे माधवी निमकर. खलनायिका म्हणून माधवी घराघरात पोहोचली. माधवीने काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये स्वतःचं हॉटेल सुरू केलं. तिच्या हॉटेलमध्ये सगळे घरगुती पारंपरिक अन् मराठमोळे पदार्थ मिळतात.