

MADHURI DIXIT ON SRIDEVI
ESAKAL
९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींनी आपलं नशीब आजमावलं. उर्मिला मातोंडकर, जुही चावला, रवीना टंडन ते काजोल आणि माधुरी दीक्षित अशा अनेक अभिनेत्रींनी हा काळ गाजवला. मात्र, या सर्वांमध्ये माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी या दोन अभिनेत्रींचं स्थान अढळ होतं. त्या काळात या दोन सुपरस्टार अभिनेत्रींमध्ये मोठी स्पर्धा असल्याचं बोललं जाई आणि अनेकदा त्यांची तुलना केली जात असे. मात्र, अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत माधुरी दीक्षितने श्रीदेवीसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे.