
Bollywood Entertainment News : अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सौंदर्यामुळे आणि फिटनेसमुळे कायम चर्चेत असते. पण याबरोबरच तिचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं आहे. मलायका सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. अर्जुन कपूरबरोबरच तिचं अफेअर आणि ब्रेकअप खूप गाजल्या. पण या दरम्यान तिने केलेल्या सोशल मीडिया पोस्टही चर्चेत राहिल्या. त्यातच आता तिने केलेल्या नव्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.