थोडक्यात :- > ममता कुलकर्णी आता पूर्णपणे साध्वीच्या भूमिकेत आहे.> स्टेजवर देवीसारखा हावभाव करताच लक्ष्मी यांनी तिला थांबवलं.> व्हिडिओमुळे पुन्हा एकदा ममता चर्चेत आली आहे..बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी काही न काही कारणामुळे चर्चेत असते. वेगवेगळे वक्तव्य, व्हिडिओ आणि फोटोमुळे तिची नेहमीच चर्चा होताना पहायला मिळते. दरम्यान प्रयागराजच्या कुंभमेळ्यात कन्नर आखाड्याने ममताला महामंडलेश्वर ही पदवी बहाल केली होती. 90 च्या दशकाचा काळ ममता कुलकर्णीने गाजवला होता. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु नंतर ती बॉलिवूडपासून खूप दूर गेली. .सध्या ममता कुलकर्णी पुर्णपणे आध्यात्माच्या मार्गावर चालत आहे. तिला महामंडलेश्वर पदवी प्रदान करण्यात आली होती. परंतु अनेक वादानंतर तिची पदवी काढून घेण्यात आली. सध्या ममता नंदगिरी म्हणून साध्वीचं जीवन जगत आहे. साध्वी झाल्यानंतर ममता कुलकर्णीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. दरम्यान अशातच आता ममताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ममता महामंडलेश्वर गटासह एका कार्यक्रमात पोहचली आहे..तिथे लक्ष्मी तिला सगळ्यांसमोर उभं राहण्यासाठी बोलवलेलं दिसत आहे. त्यानंतर कॅमेरा समोर येताच ममता देवीचा अवतार असल्यासारखं हावभाव करु लागली. त्यानंतर हात वर करुन आशीर्वाद देऊ लागली. दरम्यान तिचं कृत पाहताच लक्ष्मी यांनी रागात तिचा हात खाली झटकून दिला, आणि तिला नीट उभं रहायला सांगितलं. .दरम्यान सगळ्यांसमोर हे सगळं घडल्यामुळे ममता थोडी नाराज झाली. त्यानंतर तिने असं काही झालच नाही असं दाखवलं. दरम्यान सध्या सोशल मीडियावर ममता कुलकर्णी हिचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांच्या व्हिडिओवर मोठ्या कमेंट्स येताना पहायला मिळत आहे. .FAQs.ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदवी कधी मिळाली?कुंभमेळ्यात प्रयागराजच्या किन्नर आखाड्याने तिला महामंडलेश्वर पदवी दिली होती..ममता कुलकर्णी सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते?ती सध्या ‘नंदगिरी’ या नावाने साध्वीचं जीवन जगत आहे..कुठल्या कारणामुळे तिचं पदवी काढून घेतली गेली?विवादांमुळे आणि काही धार्मिक कारणांमुळे तिची महामंडलेश्वर पदवी रद्द करण्यात आली..व्हिडिओमध्ये काय घडलं?स्टेजवर देवीसारखे हावभाव करताच लक्ष्मी यांनी तिचा हात झटकून तिला थांबवले..'मधुबाला तु शारीरिक संबंध ठेऊ शकत नाही' डॉक्टरांचं उत्तर ऐकताच किशोर कुमारने तिला माहेरी दिलं पाठवून, म्हणाले..'ती कधीच...'.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.