
रात्रीस खेळ चाले मालिकेत वच्छीची सून शोभाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मंगल राणे आई झाली आहे.
तिने नुकताच मुलाला जन्म दिला असून, सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली.
“लेक जेव्हा आई होते तेव्हा लेकीसोबत आईसुद्धा नव्याने आईपण जगते” या भावनिक कॅप्शनसह तिने फोटो पोस्ट केला.