
एस. एस. राजामौली दिग्दर्शित बाहुबली सिनेमातील शिवगामी या प्रभावी पात्राला हिंदीत आवाज दिला मराठी अभिनेत्री मेघना एरंडे यांनी.
नुकत्याच आरपार ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत मेघनाने तिच्या डबिंग करिअरचा अनुभव आणि बाहुबलीसारख्या मोठ्या प्रकल्पाचा भाग होण्याचा अभिमान व्यक्त केला.
शिवगामीच्या डायलॉग्समुळे प्रेक्षकांवर जबरदस्त छाप पडली असून, मेघनाचा आवाज या पात्राला नवीन उंची मिळवून देणारा ठरला.