

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एव्हरग्रीन आणि दमदार अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. फक्त अभिनेत्री म्हणूनच नाही तर लेखिका, दिग्दर्शिका म्हणून मृणाल यांनी मराठीबरोबरच हिंदी इंडस्ट्रीमध्येही ओळख कमावली आहे. याबरोबरच त्यांच्या परखड मतांसाठी त्या ओळखल्या जातात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मृणाल यांनी यांनी त्यांच्या सासूबाईंनी त्यांच्या करिअरला कसा पाठींबा दिला हे सांगितलं आणि नवीन सुनांनी सासूशी कसं नातं जपावं याबद्दल सल्ला दिला.