

Mukta Barve & Rohini Hattangady New Movie
esakal
Marathi Entertainment News : मराठी रंगभूमीवर माय–लेकीचं नातं अत्यंत संवेदनशीलतेनं मांडणाऱ्या गाजलेल्या ‘चारचौघी’ या नाटकातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या रोहिणी हट्टंगडी आणि मुक्ता बर्वे या दोन दिग्गज अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. यावेळी त्या रंगभूमीवर नव्हे, तर मोठ्या पडद्यावर ‘माया’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.