Panchayat 3: "आमचे दिग्दर्शक आणि लेखक अजून..."; नीना यांनी सांगितलं पंचायत सिरीजच्या यशाचं सिक्रेट

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सध्या रिलीज होणारे प्रोजेक्ट्स आणि पंचायत थ्री वेब सिरीज यावर भाष्य केलं.
Neena Gupta
Neena GuptaEsakal
Updated on

बॉलिवूड मधील एक आघाडीच्या अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. आजवर नीना यांनी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. लवकरच त्यांच्या गाजलेल्या पंचायत थ्री या वेब सिरीजचा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय यावेळी त्यांनी दिलेल्या मुलाखतीत एनिमल आणि लापता लेडीज या सिनेमांवर भाष्य केलं.

मीना यांनी नुकतीच फर्स्ट पोस्ट या चॅनलला मुलाखत देते यावेळी त्यांना एकीकडे ॲनिमल जवान यांसारखे मुव्हीज प्रचंड कमाई करत असताना लोक लापता लेडीज आणि आर्टिकल 370 सिनेमालाही पसंती देत आहेत याबाबत तुमचं काय म्हणणं आहे असा प्रश्न विचारला यावर मीना यांनी उत्तर दिलं की, "मी तुम्हाला एक उदाहरण देईन, कारण मनोरंजनसृष्टीत कॉन्टेन्ट खूप आहे. पुस्तकांची दुकाने बंद झाली आहेत का? नाही, बरोबर? प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येकाची स्वतःची जागा असते. काही लोकांना ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट आवडतो, काहींना ‘लापता लेडीज’ आवडतो, लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट हवा असतो कारण लोक सारखे नसतात, सगळ्यांची आवड निवड सारखी नसते.

यासोबतच नीना यांना त्यांनी ही भूमिका का निवडली असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्या म्हणाल्या,"जेव्हा मला एखादी स्क्रिप्ट खूप आवडते तेव्हाच मी त्या प्रोजेक्टला होकार देते.पंचायतची स्क्रिप्ट त्यापैकी एक होती. आणि जशी जशी प्रत्येक सीजनमध्ये आम्ही पुढे जातोय तसतस कथानक अजून उत्तम होतंय. लेखक आणि दिग्दर्शक अजूनतरी त्यांच्या कामामुळे आत्मसंतुष्ट झाले नाहीयेत."

Neena Gupta
Panchayat 3 : पंचायत ३ साठी कलाकारांनी घेतलं 'इतकं' मानधन ; सचिव कि प्रधान कुणी मारली बाजी?

या मुलाखतीत त्यांनी बऱ्याच गोष्टींवरील त्यांची मत मांडली. दरम्यान, त्यांची आगामी 'पंचायत' ही वेब सिरीज अमेझॉन प्राईम वर 28 मे ला रिलीज होतेय. या वेब सिरीज मध्ये त्या साकारत असलेली सरपंचाच्या पत्नीची व्यक्तिरेखा चांगलीच हिट झाली आहे त्यांचा अभिनय अनेकांना आवडलाय

पंचायत व्यतिरिक्त नीना आगामी काळात अनेक प्रोजेक्ट्स मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यांचे 'बधाई हो', 'वध', 'लस्ट स्टोरीज' हे प्रोजेक्ट्स खूप गाजले आणि आता सगळ्यांना त्यांच्या 'पंचायत 3' वेबसिरीजची प्रतीक्षा आहे.

Neena Gupta
Panchayat 3 : वेळेआधीच पंचायत 3 चा ट्रेलर प्रदर्शित; पुन्हा एकदा रंगणार गावकरी आणि सचिवाची जुगलबंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com