Janhvi Kapoor: मराठी कलाकारांच्या मुस्काडात... गांधी-आंबेडकरांवरील जान्हवीच्या 'त्या' विधानानंतर किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Gandhi Ambedkar:"सेलिब्रिटी आणि समाजाची जाती व्यवस्थेबाबत हळू हळू बदलणारी मानसिकता आणि त्यांना गांधी-आंबेडकर यांच्याबाबत जाणून घ्यावस वाटणं म्हणजे भारताच्या उज्वल भविष्याची नांदी आहे."
Janhvi Kapoors Views On Gandhi And Ambedkar
Janhvi Kapoors Views On Gandhi And AmbedkarEsakal

अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक विधान केले आहे. जान्हवीच्या या विधानानंतर सोशल मीडियावर अनेकजन तिचे कौतुक करत आहे.

द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये जान्हवीने गांधी, आंबेडकर आणि जातीवाद अशा अनेक विषयांवर तिची मते व्यक्त केली. यानंतर अभिनेते किरण माने यांनी या विषयावर बोलल्याबद्दल जान्हवीचे कौतुक केले आहे. तर, मराठी कलाकारांना फटकारले आहे.

मला वाटते आंबेडकर आणि गांधी...

मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटासाच्या प्रमोशन दरम्यान जान्हवी कपूरने दिलेल्या मुलाखतीमध्ये जान्हवीचे विचार ऐकूण नेटिझन्सना आश्चर्यचकित धक्का बसला आहे. यामध्ये तिने महात्मा गांधी (Mahatma Gandhi), डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr. Babasaheb Ambedkar) आणि जातिभेदाचा मुद्दा शोधून काढला.

यावेळी बोलताना जान्हवी म्हणाली, "मला वाटते आंबेडकर आणि गांधी यांच्यातील चर्चा पाहणे माझ्यासाठी खूप औत्सुक्याचे असेल. एका विशिष्ट विषयावर त्यांची मते कालांतराने कशी बदलत राहिली किंवा त्यांचा एकमेकांवर कसा प्रभाव एकमेकांबद्दल काय वाटते हे पाहणे माझ्यासाठी औत्सुक्याचे ठरेल. या दोघांनीही आपल्या समाजाला खूप मदत केली आहे.”

जान्हवी पुढे म्हणाली, "आंबेडकर सुरुवातीपासूनच त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्ट आणि ठाम होते. परंतु मला वाटते की गांधींचा दृष्टिकोन विकसित होत गेला कारण त्यांना आपल्या समाजातील जातीय भेदभाव समजत गेला. तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून याबद्दल जाणून घेणे आणि ते स्वतःच सहन करणे आणि जगणे हे फार वेगळे आहे."

किरण माने यांच्यी पोस्ट

दरम्यान जान्हवीच्या या मुलाखतीनंतर अभिनेते किरण माने यांनी जान्हवीचे कौतुक केले आहे. तर मराठी कलाकारांना माने यांची चपराक लगावली आहे. किरण माने आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले, "जान्हवी कपूरनं आश्चर्याचा धक्का दिलाय ! माझं मतच बदलून गेलं तिच्याविषयी... एका बाजूला बहुतांश मराठी अभिनेत्रींमध्ये 'गांधी-आंबेडकर' यांच्याविषयी बोलताना खूप वेळा मी कुत्सित स्वर ऐकलाय.... अनुभवलाय... त्यांचे विचार आणि त्यांच्यावरची पुस्तकं न वाचताच. आय टी सेलनं व्हाॅटस् ॲपवर फाॅर्वर्ड केलेल्या उकीरड्यातल्या कचर्‍याला आणि प्रोपोगंडा सिनेमांच्या गटारघाणीला 'इतिहास' मानणार्‍या बहुतांश मराठी अभिनेते-अभिनेत्रींच्या सणसणीत मुस्काडात आहे ही ! हे ज्ञान खुप पुस्तकं वाचण्यानं आणि मेंदूच्या चिकीत्सक वापरानंच येतं. सलाम जान्हवी... खुप खुप प्रेम"

Janhvi Kapoors Views On Gandhi And Ambedkar
Sharmin Segal: "ती माझी भाची आहे म्हणून नाही तर..."; 'हिरामंडी'मध्ये शर्मीनला कास्ट करण्यावर अखेर भन्साळींनी सोडलं मौन
Janhvi Kapoors Views On Gandhi And Ambedkar
Priyanka Chopra: टीव्ही होस्ट प्रियांकाला हे काय बोलून गेला, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले, म्हणाले...

भारताच्या उज्वल भविष्याची नांदी...

जान्हीवीची ही मुलाखत व्हारल झाल्यानंतर एक्सवर अनेक युजर्सनी तिचे कौतुक केले आहे. यावेळी एका युजरने लिहिले की, जान्हवी कपूर सारखे सेलिब्रिटी आणि समाजाची जाती व्यवस्थेबाबत हळू हळू बदलणारी मानसिकता आणि त्यांना गांधी-आंबेडकर यांच्याबाबत जाणून घ्यावस वाटणं म्हणजे भारताच्या उज्वल भविष्याची नांदी आहे

पुढे आणखी एक युजर म्हणाला की, "आज जान्हवी कपूर ने दाखवून दिलाय की फिल्म इंडस्ट्रीत सगळे wp युनिव्हर्सिटी चे विद्यार्थी नसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com