

Neha Pendase On Tighee Movie
esakal
Marathi Entertainment News : आई - मुलीच्या नात्याचा हळवा, वास्तववादी आणि अंतर्मनाचा शोध घेणारा 'तिघी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. एका घरातल्या तीन स्त्रियांच्या आयुष्यातील भावनिक वळणं, न बोललेले संवाद, गृहीत धरलेली नाती आणि वेळेच्या ओघात बदलत जाणारी समजूत यांचा वेध घेणारी ही कथा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मात्र या तिघींमधील 'स्वाती' ही व्यक्तिरेखा साकारताना नेहाने अनुभवलेला प्रवास खूप खास आहे. हा प्रवास तिने सगळ्यांसोबत शेअर केला आहे.